महत्वाच्या घडामोडी

झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून बापाने केले असे काही…

प्रतिनिधी / व्हायरल

सोशल मिडीयावर सध्या बाईकवरून जाणाऱ्या एका वडिलांचा आणि मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हणतात, परंतु आई प्रमाणेच वडीलही मुलांसाठी तितकेच महत्वाचे असतात..

वडिलांचा आधार भक्कम असला की मुलांना आयुष्यात कोणतीही उंची गाठायला वेळ लागत नाही.. आई – वडील आपल्या मुलांना कोणताही त्रास होऊ नये याची सतत काळजी घेत असतात.. याचीच प्रचीती हा व्हिडीओ पाहून येते..

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलासह स्कूटरवरून प्रवास करत असल्याचे दिसत आहे.. प्रवास करत असताना मागे स्कूटरवर बसलेला हा मुलगा झोपी गेला आहे.. त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडू नये यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला पकडले आहे..

या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती एका हाताने मुलाला पकडून तर दुसऱ्या हाताने स्कूटर चालवत आहे.. हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांनी वडिलांच्या प्रेमाचे कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *