महत्वाच्या घडामोडी

गोव्याहून मुंबईला बस मधून येत असताना तरुणीसोबत घडलं असं काही…

प्रतिनिधी / मुंबई

एका खाजगी बसने गोव्याहून मुंबईकडे येत असताना प्रवासादरम्यान एका तरुणीचा बसमध्येच आकस्मित मृत्यू झाल्याची धाकादायक घटना घडली आहे.. ही तरुणी गोवा येथील रहिवासी आहे.. तमिना आलेम ( वय – २२ ) असे या मृत तरीनीचे नाव आहे..

तमिनाचा काही दिवसापूर्वी गोवा येथे स्कुटी शिकत असताना अपघात झाला होता.. या अपघातात तमिनाला खांद्यावर जखम झाली होती.. म्हणून पुढील उपचारासाठी तमिनाच्या आईने तिला मुंबईला बोलावले होते..

तमिना आईने बोलावल्याप्रमाणे पुढील उपचारासाठी आपला मित्र सचिन किट्टू याच्यासोबत मुंबईला येत होती.. मात्र नेरूळ येथे बस आल्यावर तमिना काहीच हालचाल करत नसल्याचे लक्ष्यात आले.. त्यानंतर तमिनाला नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले..

मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.. या घटनेबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.. प्रवासादरम्यान अचानक मृत्यू कसा काय झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *