महत्वाच्या घडामोडी

दुसऱ्यांदा NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तरुणीने संपवले जीवन…

प्रतिनिधी / अकोला

दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात.. मात्र नीट परीक्षा खूप अवघड असल्याने या परीक्षेतील अपयशाच्या भीतीने अनेक विध्यार्थानी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.. अशीच एक धक्कादायक घटना अकोला शहरात घडली आहे.. दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने अकोल्यातील एका तरुणीने टोकाचा निर्णय घेतला आहे..

रोहिणी विलास देशमुख असं या तरुणीचं नाव आहे.. रोहिणी देशमुख हिने अकोला शहरात मध्य भागात असलेल्या मोर्णा नदीच्या पुलावरून उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे.. रोहिणी हिला नीट परीक्षेत ३५० च्या आसपास गुण मिळाले होते.. यंदा दुसऱ्यांदा दिलेल्या नीट परीक्षेच्या निकालात तिला ४२० गुण मिळाले.. रोहिणी ही ओपन वर्गातून येत असल्याने तिला ५६५ च्या वर गुणांची अपेक्षा होती.. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती तणावात होती..

रात्री नियमितपणे रोहिणीने कुटुंबासोबत जेवण केले आणि नंतर सगळे झोपी गेले.. मात्र पहाटे रोहिणी घराच्या बाहेर पडली आणि तिने हा टोकाचा निर्णय घेतला.. या घटनेने रोहिणीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.. या घटनेची जूने शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *