महत्वाच्या घडामोडी

कोल्हापुरात गणपती विसर्जनावेळी मोठी दुर्घटना…

प्रतिनिधी / कोल्हापूर

इचलकरंजी येथील रुई बंधाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन युवक पंचगंगा नदीत पाय घसरून पडले.. त्यातील एका तरुणाला वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.. मात्र दुसरा तरुण पंचगंगा नदीचा प्रवाह वेगवान असल्याने पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..

स्वप्नील मारुती पाटील (वय – २२ ) रा. दत्तनगर कबनूर असं बुडालेल्या तरुणाच नाव आहे , तर विशाल पाटील (वय – २२ ) रा. फरांडे मळा कबनूर याला वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.. इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी प्रशासन विरुद्ध हिंदुत्ववादी संघटना आणि लोकप्रतिनिधी असा वादविवाद सुरु आहे..

शासनाकडून शहरात पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती विसर्जन व्हावे, याकरिता ठिकठिकाणी कुंड देखील तयार करण्यात आले आहेत.. मात्र तरीही काही नागरिक गणपती विसर्जन करण्यासाठी पंचगंगा नदीमध्ये गेले.. स्वप्नील पाटील हा आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा आहे.. आपत्ती व्यवस्थापन दलाकडून व पोलिसांकडून त्याला शोधण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *