महत्वाच्या घडामोडी

सेल्फिचा नाद तरुणाला पडला भलताच महागात…

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर येथे रेल्वे स्थानकात थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना विध्युत तारेचा शॉक बसल्याने एक १७ वर्षाचा तरुण भाजून गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुकसित मुजाहिद जमादार (वय – १७ ) रा. सिद्धेश्वरपेठ सोलापूर असे या तरुणाचे नाव आहे.

मुकसित हा रेल्वे स्थानकात बाळेच्या दिशेकडील कॅबिनजवळ थांबलेल्या एका मालगाडीवर चढून मोबाईलने सेल्फी घेत होता. यावेळी विध्युत तारेचा स्पर्श झाल्याने तो भाजला आणि खाली कोसळला..आणि त्याच्या अंगावरील सर्व कपडे जळाले.

मुकसितला गंभीर अवस्थेत रेल्वे पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुकसित हा ९० % भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मुकसित जमादार हा अकरावी इयत्तेत शिकत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *