महत्वाच्या घडामोडी

पोलीस दलात भरती होण्याचं त्याचं स्वप्न अधुरचं राहिलं.. पाहा काय घडलं…

प्रतिनिधी / मुंबई

मुंबईतून वसईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. पोलीस भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी धावण्याचा सराव करताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.. हृतिक महेंद्र मेहेर ( वय – २२ ) असे या मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे..

हृतिक याचे वडील एसटी महामंडळात कामाला आहेत तर आई भाजी विकायचं काम करते.. आई – वडील दोघांचेही स्वप्न होते की आपला मुलगा पोलीस बनेल.. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होत..

हृतिकही पोलीस भरतीसाठी मेहनत घेत होता.. हृतिक या तरुणाचे बीकॉम पर्यंत शिक्षण झाले होते.. हृतिक ने पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या एका अकॅडमीत प्रवेशही घेतला होता.. पोलीस दलात भारती होण्याचं त्याचं स्वप्न होत..

हृतिक हा नेहमीप्रमाणे धावण्याचा सराव करण्यासाठी रानगाव येथे किनाऱ्यावर गेला होता.. आणि धावत असताना त्याला उलट्यांचा त्रास सुरु झाला.. त्यानंतर तो जागेवर कोसळला आणि बेशुद्ध झाला.. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले..

हृतिकचे पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले कारण हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा एका क्षणात मृत्यू झाला होता.. त्याच्या अशा अकस्मात मृत्यूने आई – वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *