महत्वाच्या घडामोडी

प्रेयसीचं लग्न दुसऱ्याशी जमलं, त्यानं केला आयुष्याचा शेवट.. पाहा नक्की काय घडलं…

प्रतिनिधी / पुणे

पुणे येथे सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे लॉजवर एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसमोरच तिच्याच ओढणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.. साकीब लतीफ इनामदार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे..

मृत झालेल्या साकीब आणि त्याची प्रेयसी यांच्यामध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.. साकीब आणि त्याची प्रेयसी हे दोघेही सकाळी गोळेवाडी येथील किनारा लॉजवर भेटले होते.. साकीब याच्या प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी जमले होते..

लॉजवर या दोघांमध्ये लग्नावरून वाद झाला.. साकीबच्या प्रेयसीचे लग्न जमल्यानंतर त्यांची ही शेवटची भेट होती.. काही दिवसांतच त्याच्या प्रेयसीचा विवाह होणार होता.. साकीब या तरुणाने आता तुझे दुसऱ्याशी लग्न जमले आहे, मी जगून तरी काय करू? असे म्हणत तिच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे..

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.. या घटनेची हवेली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *