महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! शॉक लागून सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू…

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहरात एका सफाई कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. आफ्रिदी अब्दुल शेख ( वय – २४ ) असे या तरुणाचे नाव आहे..

आफ्रिदी शेख हा सोलापुरातील सहारा मशिद, आंबेडकर नगरचा रहिवासी आहे.. सोलापुरात पहाटे पासून पाऊस सुरु आहे.. आफ्रिदी हा सफाई कर्मचारी मॉलच्या बसमेंटमध्ये सफाई करण्यासाठी गेला होता.. तेथे पाणी असल्यामुळे आफ्रिदी याला शॉक लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे..

या घटनेनंतर आफ्रिदी याचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे.. आफ्रिदी शेख याच्या अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *