महत्वाच्या घडामोडी

सुसाइड नोट लिहून मामाच्या घरी तरुणाने केलं असं काही..ऐकून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / यावल

यावल तालुक्यातील किनगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाने ठाणे येथील आपल्या मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. गणेश अनिल निंबायत ( वय – २२ ) असे या तरुणाचे नाव आहे.. गणेश याने आत्महत्येपूर्वी एक सूसाइड नोटही लिहिली आहे..

गणेश निंबायत हा ठाणे येथे गोदरेज कंपनीत नोकरीला होता.. आणि तेथेच तो आपल्या मामाच्या घरी राहत होता.. मात्र काल सकाळी त्याने एक चिठ्ठी लिहित मीन एक जबाबदार मुलगा होवू शकलो नाही आणि एक जबाबदार भाऊही होवू शकलो नाही असे लिहून आपली निराशा व्यक्त केली आहे.. आणि आपल्या मामाच्या राहत्या घरी गणेश याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.. गणेश याच्या पश्चात आई -वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *