महत्वाच्या घडामोडी

गुडबाय लाईफ असं स्टेटस ठेवत,संपवले जीवन…

प्रतिनिधी / कोडोली

गिरोली घाट येथील पांडवलेणी परिसरात रात्री एका चारचाकी वाहनातच तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. त्यानंतर तेथेच एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.. ऋतुजा प्रकाश चोपडे ( वय – २१ ) असे या तरुणीचे नाव आहे.. तर कैलास आनंदा पाटील ( वय – २६ ) असे तरुणाचे नाव आहे.. हा खून प्रेमप्रकरणातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे..

ऋतुजा ही पेठवडगाव एका महाविद्यालयात डी. फार्मसीचे शिक्षण घेत होती.. आणि तेथेच ती वसतिगृहात राहत होती.. ऋतुजा ही सायंकाळी कैलासबरोबर मोटार कार मधून पन्हाळ्याच्या दिशेने गेली होती त्याचदरम्यान कैलास याने ऋतुजाचा नॉयलान च्या दोरीने गळा आवळून व तिच्या डोकाय्त वार करून तिचा खून केला आहे.. खून केल्यानंतर कैलासने व्हाट्सअप स्टेटसवर मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ, असा मेसेज टाकला.. त्यानंतर रात्री त्याने विष प्राशन केल्याची माहितीही आपल्या वडिलांना दिली.. त्यानंतर कैलासच्या वडिलांनी तातडीने वडगाव पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तेथे कैलास हा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत आढळला.. खोतवाडीतही या खुनाची माहिती मिळताच गावातील काही प्रमुख लोक व ऋतुजाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.. या घटनेमुळे दोघांच्याही नातेवाईकांना धक्का बसला आहे.. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *