महत्वाच्या घडामोडी

१५००० फूट उंचीवर असलेल्या धबधब्यावर करत होते आंघोळ, अचानक पाय घसरला आणि घडलं असं काही…

प्रतिनिधी / नाशिक

नाशिक शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे.. येथे सुरत वरून सहलीसाठी आलेल्या विध्यार्थ्याचा धबधब्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे.. तक्षिल संजाभाई प्रजापती ( वय – १८ ) असे या मृत झालेल्या विध्यार्थ्याचे नाव आहे..

तक्षिल हा सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग and technology या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी होता.. दहा ते बारा मित्रांबरोबर तो पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता..

तक्षिल व त्याचे मित्र उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूट चोंड शॉवर पॉईट धबधब्यावर पोहोचले.. तिथे आंघोळ करत असताना खडकावर शेवाळ असल्याने तक्षिलचा पाय घसरला आणि तो १५०० फूट खाली खडकावर आपटला.. डोक्याला गंभीर लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे..

या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.. आणि पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.. त्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *