महत्वाच्या घडामोडी

‘ everything will be ok ‘ असं स्टेट्स ठेऊन तरुणाने संपवले आपले जीवन…

प्रतिनिधी / औरंगाबाद

औरंगाबादमधील बिडकीन एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने व्होट्सअपवर स्टेट्स ठेऊन आत्महत्या केली आहे.. ओमकार नारायण डांगरे ( वय – २१ ) असे या मृत तरुणाचे नाव आहे..

ओमकार हा घरात काहीही न सांगता बाहेर गेला होता.. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही, म्हणून त्याच्या आई – वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत मोबाईल नंबर वरून ट्रेक केले असता मोबाईल नंबरचे लोकेशन एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत मिळून आले..

पोलिसांनी तात्काळ औद्योगिक वसाहतीमधील सेक्टर क्रमांक १८ मध्ये धाव घेतली.. तिथे विहिरीजवळ ओमकार याची गाडी आणि चप्पल दिसून आली.. त्यानंतर लगेच पोलिसांनी अग्निशामक दलास पाचारण केले..

एक तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ओमकार याचा मृतदेह बाहेर काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.. ” I just feel like if i died everything will be ok ” अशा प्रकारे व्होट्सअपवर स्टेट्स ठेऊन ओमकारने आपली जीवनयात्रा संपली आहे..

ओमकार हा पोलीस व सैन्य भरती तसेच शासकीय नोकरीची तयारी करत होता अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे.. ओमकारच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *