महत्वाच्या घडामोडी

गणेशोत्सवासाठी आलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू…

प्रतिनिधी / जळगाव

पाचोरा येथील पोलीस उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा आदित्य महाजन (वय – १९ ) हा नांदेड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.. गणेशोत्सव असल्याने आदित्य हा पाचोरा येथे आला होता..

बुधवारी सायंकाळी आदित्य पाणी भरण्यासाठी विजेचा पंप सुरु करण्यासाठी गेला असता, विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.. पोलीस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी पोलीस वसाहतीतील असुविधा व समस्यांबाबत यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.. या घटनेने पोलीस वसाहतीत शोककळा पसरली आहे.. महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *