महत्वाच्या घडामोडी

एकीला वाचवायला गेले आणि सगळेच बुडाले.. पाहा नक्की काय घडलं…

प्रतिनिधी / कानपूर

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सहा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. ही मुले एकाच कुटुंबातील एकमेकांचे नातेवाईक होते.. या मुलांचा शेवटचा फोटो समोर आला आहे.. ही घटना घडण्याच्या आधी काही मिनिटांपूर्वीच हा फोटो काढण्यात आला होता..

सौरव कटियार या काकांच्या दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व नातेवाईकांची मुले आली होती.. काल दुपारी गंगा नदीच्या पात्रात उभे राहून या सर्वांनी फोटो काढला होता.. या मुलांमध्ये चार मुली व दोन मुलांचा समावेश आहे.. फोटो काढत असताना त्यांच्यातील एक मुलगी बुडू लागली आणि तिला वाचवण्यासाठी एका पाठोपाठ सगळ्यांनी नदीत उड्या मारल्या.. मात्र सगळेजण पाण्यात बुडाले.. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचं पथक तेथे पोहोचलं.. तोपर्यंत एका मुलाचा मृतदेह हाती लागला होता.. इतर मुलांचाही शोध सुरूच होता.. पाण्याचा वेग जास्त असल्याने मुले दूरपर्यंत वाहत गेली असावीत अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.. मुले बुडाल्याने त्यांच्या कुटुंबियांना जोराचा धक्का बसला आहे.. तसेच एकाचवेळी सहा मुले बुडाल्याने परिसरातही खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *