महत्वाच्या घडामोडी

या चिमुकलीची शिकवण्याची स्टाईल आणि जोश पाहून तुम्हीही तिचे कौतुक कराल…

प्रतिनिधी / व्हायरल

प्रत्येक शिक्षकांची मुलांना शिकवण्याची पद्धत वेगळी असते.. काही शिक्षक अतिशय प्रेमाने मुलांना समजेपर्यंत शांतपणे समजून सांगतात.. तर काही शिक्षक फक्त फळ्यावर लिहून त्याच्याआधारे मुलांना समजून सांगतात..

काही शिक्षक हातात अजिबात पुस्तक न घेता मुलांना शिकवतात.. तर काही शिक्षक मुलांशी गप्पा मारत, हसत खेळत मुलांना शिकवतात.. घरात देखील काही मुले शाळा शाळा खेळताना दिसतात..

सध्या सोशल मिडीयावर असाच एका चिमुकलीचा शिकवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. या व्हिडीओमधील ही लहान मुलगी वर्गात पुढे उभे राहून मुलांना आकडे म्हणायला शिकवत आहे.. अवघ्या ३ ते ४ वर्षाच्या या मुलीचा आवाज खणखणीत तर आहेच परंतु ती अतिशय जोशात मुलांकडून हे आकडे म्हणून घेत आहे..

या चिमुकलीच्या बोबड्या सुरात हे आकडे ऐकायला खूप छान वाटतात आणि तिच्या या उत्साहाचे आपल्याला कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही.. शाळेचा गणवेश आणि टाय घातलेली ही मुलगी पूर्ण जीव तोडून ओरडून आकडे म्हणत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *