महत्वाच्या घडामोडी

चिमुकल्या बहिणींचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…

प्रतिनिधी / व्हायरल

श्री कृष्णांनी जीवन म्हणजेच संघर्ष असे म्हणले आहे.. तुम्ही या जगात आला असाल तर तुमच्या आयुष्यात नेहमीच संघर्ष असेल.. स्वतः देव जरी मानवी अवतार घेऊन पृथ्वीवर आला तरी त्याला संघर्ष चुकत नाही.. मात्र काही लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो हे पाहून तुमचेही डोळे पाणावतील..

सोशल मिडीयावर सध्या असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे.. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली रस्त्याच्या कडेला स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.. यावेळी तिथून खूप जण ये – जा करत होते परंतु त्यांना कोणीही पैसे द्यायला तयार नव्हते..

या मुलीना कोणीही मदत करायला तयार नव्हते.. त्यानंतर थोड्या वेळाने ढोलकी वाजवणाऱ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू येतात.. ती रडू लागते.. पण नंतर तिला समजते की रडण्याने आपले आयुष्य सोपे होणार नाही.. मग पुन्हा एकदा रडत रडत ती ढोलकी वाजवू लागते..

तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तिची बहिण स्टंट करताना दिसत आहे.. हा व्हिडीओ प्रचंड भाऊक करणारा आहे.. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *