महत्वाच्या घडामोडी

पाणी गरम करण्यासाठी हिटर वापरताय तर सावधान ! पाहा या महिलेसोबत काय घडले…

प्रतिनिधी / बीड

आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी आजकाल अनेकजण विध्युत हिटरचा वापर करताना दिसतात.. मात्र या हिटरचा काळजीपूर्वक वापर न केल्यास ते आपल्या जीवावर बेतू शकते.. याचे एक उदाहरण समोर आले आहे.. बीड जिल्ह्याच्या पिंपळगाव येथे हिटरमधील उकळते पाणी झोपलेल्या एका महिलेच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे..

उषा रंजीत सुरवसे ( वय – ३१ ) असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.. रात्रीच्या सुमारास उषा या झोपल्या होत्या.. मात्र, पाणी गरम करण्यासाठी सुरु केलेला हिटर बंद न केल्यामुळे प्लास्टिकची टाकी उकळत्या पाण्यामुळे फुटली आणि उकळलेले सर्व पाणी झोपलेल्या उषा यांच्या अंगाखाली येऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.. त्यानंतर उषा सुरवसे यांना जखमी अवस्थेत आंबेजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.. उषा सुरवसे यांच्या पश्चात पती, तीन मुली व एक मुलगा असं परिवार आहे.. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *