महत्वाच्या घडामोडी

हेअर डाय करूनही महिलेचे केस राहिले पांढरे,महिलेनं पहा काय केलं…

प्रतिनिधी / सोलापूर

तुम्ही माझ्या केसांना व्यवस्थित कलर न केल्यामुळे, माझे केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत, असा आरोप करत एका महिलेने सलून चालकाला चक्क चप्पलने मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे.. मोहमद साजिद सलमाने (वय – २२ ) असं या सलून चालकाचे नाव आहे.. सोलापुरातल्या सात रस्ता परिसरात डायमंड हेअर सलून आणि ब्युटी पार्लर आहे.. या घटनेबाबत बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद देण्यात आली आहे..

वर्षा काळे असं या महिलेचे नाव असून, ती सोलापुरातल्या सात रस्ता परिसरात असणाऱ्या डायमंड हेअर सलून आणि ब्युटी पार्लर मध्ये हेअर कट आणि हेअर कलर करण्यासाठी आली होती.. यासाठी पार्लर चालकाने पाच हजार बील आकारले होते.. मात्र काही दिवसांनी पुन्हा एकदा महिला ब्युटी पार्लर मध्ये आली.. आणि तिने कलर केल्यानंतरही माझ्या डोक्यात पांढरे केस कसे काय आले, याचा जाब विचारत पैसे परत करण्याची मागणी केली..

कलर केलेल्या केसांचा रंग तसाच आहे, नवीन येणारे केस हे पांढरे आहेत.. त्याला काही पर्याय नाही असे उत्तर सलून चालक मोहम्मद कासीम यांनी दिली.. याचा राग अनावर झाल्याने वर्षा काळे यांनी चक्क सलून चालकांना मारहाण करण्यास सुरवात केली.. एवढेच नाही तर त्यांनी दुकानातील साहित्याची नासधूस केली आणि सलूनमधील महागडे साहित्य घरी नेल्याचे आरोपही सलून चालक मोहम्मद यांनी केला.. वर्षा काळे यांच्या डोक्यावर नैसर्गिकरित्या पांढरे केस उगवत होते..

नैसर्गिकरित्या डोक्यातून पुन्हा नव्याने येणाऱ्या केसांना पुन्हा एकदा कलर करावे लागेल असे ब्युटी पार्लर चालकाने सांगितले.. मात्र ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि तिने चप्पलने मारहाण करण्यास सुरुवात केली व दुकानातील काचाही फोडल्या.. या घटनेबाबत आम्ही सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे असे सलून चालकांनी म्हटले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *