महत्वाच्या घडामोडी

वडिलांना फोन केला आणि तिनं संपवलं आपलं आयुष्य.. पाहा काय घडलं…

प्रतिनिधी / मध्यप्रदेश

मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. इंदोरमध्ये एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अजयभाई आपल्या कुटुंबासहित राहतात.. अजयभाई यांचा पत्नी, आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.. अजयभाई यांची पत्नी टीना हिला अनेकवेळा सासरच्या मंडळींकडून आणि नातेवाईकांकडून त्रास होत होता..

सून टीना हिला तिचे वडील रामभाई यांच्या घरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी सासू- सासरे करत होते.. मात्र टीना हिने आपल्या माहेरची परिस्थिती खूप वाईट आहे, असे असताना माझे आई- वडील पाच लाख रुपये कसे काय जमवतील? असा विचार करून तिने सासू आणि दिराला माहेरहून जास्तीचे पैसे आणण्यास नकार दिला.. हे ऐकून टीना हिची सासू आणि दीर यांनी टीना हिच्यावर राग काढण्यास सुरवात केली.. त्यांनी तिचा छळ सुरु केला.. त्यानंतर टीना हिने आपल्या वडिलांना फोन करून “मला इथून घेऊन जावा, माझी सासू आणि दीर मला मारहाण करतात, आता मला हा छळ सहन होत नाही.”असे सांगितले..

हे ऐकून टीनाच्या वडिलांना धक्का बसला.. टीनाचे आई- वडील ताबडतोप तिच्या सासरच्या मंडळीना भेटण्यासाठी घरातून निघाले.. परंतु वाटेतच त्यांना फोन आला की त्यांची मुलगी टीना ही आता या जगात नाही.. हे ऐकल्यावर मात्र टीनाच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला.. टीना ही आपल्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती.. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.. टीनाच्या हातावर आणि पायावरही जखमा दिसत होत्या.. टीनाच्या वडिलांनी सासू आणि दीर यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.. पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *