महत्वाच्या घडामोडी

घरकाम करताना सर्पदंश झाल्यामुळे २४ वर्षीय महिलेचा मृत्यू…

प्रतिनिधी / परभणी

परभणीच्या पालम तालुक्यातील पेठशिवानी येथे घरकाम करत असताना साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.. शितल बापूराव मामीलवाड (वय – २४ ) असे मृत महिलेचे नाव आहे.. पेठशिवानी येथील शितल मामीलवाड या घरकाम करत असताना त्यांना सापाने चावा घेतला.. ही बाब त्यांच्या लक्ष्यात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले..

परंतु, साप विषारी असल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.. शितल मामीलवाड यांचं काही वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं.. त्यांच्या पश्चात पती, एक लहान मुलगा, सासू, दीर असा मोठा परिवार आहे.. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, मामीलवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *