महत्वाच्या घडामोडी

संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रेयसीसोबत केलं असं काही…

प्रतिनिधी / मुंबई

मुंबईतील चेंबूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. पतीचे परस्त्रीशी संबंध असल्याच्या रागातून पत्नीने आपल्या मैत्रिणींच्या साथीने पतीच्या प्रेयसीला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. ईशा मिस्त्री (वय – १६ ) असे या मृत प्रेयसीचे नाव आहे..

योगेश असे पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी मीनल हिची मैत्रीण डॉली हिच्या घरी प्रेयसी ईशा हिला नेवून ठेवले होते.. ही बातमी डॉलीने आपली मैत्रीण मीनल हिला सांगितली.. त्यानंतर मीनल आपली बहिण शिल्पा हिला घेऊन डॉलीच्या घरी गेली.. त्यानंतर मीनलने डॉली हिला ईशाला इमारतीच्या छतावर आणायला सांगितले.. ईशा इमारतीच्या छतावर आल्यानंतर मीनलने आपली बहिण शिल्पा आणि डॉलीच्या साथीने ईशाचा गळा दाबून तिची हत्या केली आहे.. त्यानंतर ईशाचा मृतदेह एका गोणीत भरून रिक्षाने बंटर भवन येथील नाल्यात टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे..

याबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दोन महिलांनी रिक्षातून ही गोणी आणल्याचे समोर आले आहे.. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध लावला.. रिक्षा चालकाने या दोन महिला ठक्कर बाप्पा कॉलनीमधून रिक्षा करून माहुल गाव इथे गेल्या होत्या आणि माहुल गाव येथून एक गोणी घेऊन पुन्हा त्याच रिक्षातून कुर्ल्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली.. ही माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेतील तिन्ही महिला आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *