महत्वाच्या घडामोडी

पतीने पत्नीला गिफ्ट दिला स्मार्ट फोन, पण एका गोष्टीनं केला घात.. पाहा पुढे काय घडलं…

प्रतिनिधी / ओडिशा

ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यातील एमपीवी १४ या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे राहणाऱ्या एका पत्नीने पतीशी भांडण झाल्यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.. या आत्महत्येचे कारण समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले आहेत..

कनहेई मंडल असे पतीचे नाव असून, ज्योती असे या आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे.. कनहेई ने आपली पत्नी ज्योती हिला एक स्मार्ट फोन गिफ्ट केला होता.. हा फोन खूप महागडा असल्यामुळे पूर्ण पैसे देणे कनहेईला शक्य नव्हते..

या कारणामुळे कनहेई याने हा फोन ईएमआयवर खरेदी केला होता.. मात्र ही गोष्ट ज्योतीला माहित नव्हती.. या फोनचा शेवटचा हप्ता देखील कनहेई यांनी भरला होता.. हा फोन जिथून खरेदी केला आहे तिथून ईएमआयचे कागदपत्र सहीसाठी घरी आले.. आणि त्यानंतर ईएमआयबद्दल ज्योतीला समजले..

हे समजल्यानंतर ज्योती आणि कनहेई यांच्यात जोराचे भांडण झाले.. ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवली यावरून दोघांच्यात रात्री उशिरापर्यंत भांडण सुरु होते.. त्यानंतर ज्योतीने कनहेई समोर विष प्राशन केले.. हे पाहून कनहेई बेशुद्ध पडले..

या घटनेनंतर कुटुंबीयांनी ज्योती आणि कनहेई यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दखल केले.. परंतु तेथे डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले.. तसेच कनहेई यांच्यावर उपचार सुरु आहेत.. पत्नीच्या मृत्यूने कनहेई यांना धक्का बसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे..

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कनहेई यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.. ही आत्महत्या होती की हत्या या गोष्टीचा पुढील तपास पोलीस करत आहेत.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *