महत्वाच्या घडामोडी

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची थकबिले आजपासून वाटप

पंढरपूर तालुक्याचा आर्थिक राजवाडा मानल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची थकलेली उसबिले आजपासून वाटप होणार असल्याची माहिती चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली आहे..

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर देणी होती.. तत्कालीन संचालक मंडळ व चेअरमन देणी देण्यास असमर्थ ठरले होते, मात्र नवीन चेअरमन व संचालक मंडळाने मोळी टाकायच्या आत शेतकऱ्यांची सगळी बिले देण्याचा शब्द पाळला असल्याचं दिसून येतंय..

आता सभासद शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची बिले मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *