Uncategorized

विनायक मेटे याचं अपघाती निधन ! मराठा आरक्षणाचा चेहरा हरपला

मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे निधन झाले आहे.. त्यांच्या गाडीला आज पहाटे खोपोलीत अपघात झाला होता, त्यांच्यावर पनवेल येथील एका हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते..

त्यांच्या वाहनात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे..

मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई येथे महत्वाची बैठक होती, त्यासाठी ते मुंबईला निघाले होते.. त्यांनी बीडमध्ये आज बाईक रेलीच आयोजनही केलं होत.. मात्र मराठा आरक्षण बैठकीसाठी आमंत्रण आल्यानं ते बीड मधून मुंबईला निघाले होते..

मराठा आरक्षणाचा एक मोठा चेहरा हरपल्याने राज्यातून हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *