पर्यावरण,शिक्षण

या गावातील भिंती सजल्या आहेत गणितांच्या सूत्रांनी

प्रतिनिधी \ सोलापूर

गावोगावच्या भिंतींवर  शासनाच्या अनेक योजनांची माहिती असते.. काही गावात तर भिंतींच्या भीती वेगवेगळ्या जाहिरातींनी व्यापून गेलेल्या असतात.. मात्र उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज या गावात काहिसं वेगळ चित्र आहे…

आपण हिरज गावात प्रवेश करताच आपल्याला गावची कमान दिसणार नाही, मात्र आपल्याला दिसतात गणितांनी आणि गणितांच्या सूत्रांनी रंगवलेल्या भिंती..

हिरज साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल छोटसं गाव.. या गावाने एक अभिनव उपक्रम राबवला आहे…

गावातील घरांवर,शाळांवर, पाण्याच्या टाक्यांवर जिथं मोकळी जागा असेल तिथ या गावकऱ्यांनी बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,अबकड,बारा महिने, यांसोबत गणिताची अनेक सुत्रे रेखाटली आहेत..

सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मूल गावातल्या शाळेत शिकतातच.. मात्र घरी आल्यानंतरही आपल्या गल्लीत खेळत असताना त्यांची नजर या सूत्रांवर जाऊन हसत खेळत त्यांना शिक्षण घेता यावं, हा यामागचा उद्देश असल्याचं या गावचे शिक्षण समितीचे अध्यक्ष सांगतात..

या उपक्रमामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडली असून आता त्यांना गणिताची आवड निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांमधून येत आहेत..

आता या गावातील लहानगी मुलानाही शिक्षणाची अधिक गोडी निर्माण झाली असून त्यांना या गानिताच्या भिंतींचा फायदा होत असल्याचं चित्र आहे..

एकंदरीतच काय तर प्रयोगशील शिक्षण हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत

महत्वाची भूमिका बजावत असते.. गावच्या भिंती जाहिरातींनी रंगवाण्यापेक्षा ज्ञानांनी रंगवल्या तर गच्या भविष्यात अनेक रंग भरले जातीत यात शंका नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *