महत्वाच्या घडामोडी

वऱ्हाड निघालं विमानानं ! लग्नाच्या वऱ्हाडींसाठी बस नाही तर चक्क विमानच केलं बूक…

प्रतिनिधी / व्हायरल

लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण असतो.. लग्न हा क्षण आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत तसेच मित्र – मैत्रिणींनसोबत साजरा करतो.. लग्नाचे क्षण कायम आठवणीत राहण्यासाठी कोण काय काय करेल काही सांगता येत नाही..

वधू – वरांना आशीर्वाद देण्यासाठी तर वऱ्हाडी मंडळी पाहिजेतच.. परंतु लग्न जर आपण राहतो तिथेच असेल तर काही वाटत नाही, पण जर लग्न दुसऱ्या गावाला असेल तर वऱ्हाडी मंडळींना मुलाकडचे किंवा मुलीकडचे एखादी बस किंवा ट्रेन बूक करतात..

परंतु वऱ्हाडी मंडळींसाठी एखादे विमान बूक केल्याचे तुम्ही फारसे ऐकले नसेल.. सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका कपलने आपल्या लग्नाला येणाऱ्या मंडळींसाठी चक्क विमानच बूक केलय..

या व्हिडीओमध्ये लग्नाला जाणारे सगळे लोक किती उत्साही आहेत हे दिसत आहे.. व्हिडीओच्या शेवटी ज्यांचे लग्न आहे ते कपल देखील दिसत आहे.. ही वऱ्हाडी मंडळी विमानाने कुठून कुठे प्रवास करत आहेत हे अद्याप समजले नाही.. याह व्हिडीओ पाहून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *