महत्वाच्या घडामोडी

भयानक ! “ हे सगळं आत्म्यानं केलंय, बदला पूर्ण झाला..” अशी सुसाईड नोट लिहून पोटच्या मुलांची हत्या करून वडिलांनी घेतला गळफास…

प्रतिनिधी / पिलीभीत

यूपीच्या पिलीभीत येथे रंबोझा गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.. येथे अंधश्रद्धेतून एका व्यक्तीने आपल्या मुलगा आणि मुलगी अशा दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे आणि नंतर स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे..

तसेच त्याच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे त्यात “ हे सगळं आत्म्यानं केलंय, बदला पूर्ण झाला..” असे लिहिले आहे.. बालकराम असे या व्यक्तीचे नाव आहे.. बालकराम हा पिलीभितीमध्ये सायकल दुरुस्तीचे काम करत होता..

बालकराम याला ११ वर्षाचा एक मुलगा आणि १५ वर्षाची एक मुलगी अशी दोन मुले होती.. बालकराम याने अंधविश्वासामुळे अगोदर आपल्या मुलांचा गळा दाबून त्यांचा खून केला आणि नंतर स्वतःच गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे..

त्यानंतर हा सगळा प्रकार बाजूच्या खोलीत असणाऱ्या मुलाने पाहिला आणि त्याने कुटुंबियांना याची माहिती दिली.. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.. बालकरामच्या दोन्ही मुलांचे मृतदेह हे बेडवर पडलेल्या अवस्थेत सापडले तर दुसऱ्या खोलीत बालकराम याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे..

पोलिसांना बालकरामच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली आहे त्यातील मजकूर वाचून पोलिसांनाही धक्का बसला आहे.. त्यानंतर या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.. ही सुसाईड नोट कोणीतरी बोलून लिहून घेतली आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे..

या प्रकरणाची चौकशी सुरु असून ही नोट नेमकी कोणी लिहिली आहे याचा शोध घेतला जात आहे.. या नोटमधील रायटिंग टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहे.. पुढील तपास पोलीस करत आहेत.. वडील आणि दोन मुले यांच्यावर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले.. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *