महत्वाच्या घडामोडी

वाडीकुरोलीच्या प्रीती काळेला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक…

प्रतिनिधी / पंढरपूर

वाडीकुरोली येथील वसंतराव काळे प्रशालेतील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबचीअष्टपैलू खेळाडू प्रीती अशोक काळे हिला  महाराष्ट्र संघाकडून खेळताना  महिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.

दिनांक 20 ते 24 नोव्हेंबर राजी उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय खो खो स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्र महिला  संघाने एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया महिला संघाचा एक डाव सात गुणांनी पराभव करून सुवर्णपदक मिळवले.

महाराष्ट्र महिला संघातील सर्वच खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करत महाराष्ट्राला  विजेतेपदाचा मुकुट मिळवून दिला.या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण बागल प्राची वाईकर यांचे मार्गदर्शन लाभले . महाराष्ट्र संघाकडून खेळताना राष्ट्रीय खो खो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणारी पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिली खेळाडू आहे.

तिच्या या यशाबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे सचिव बाळासाहेब काळे भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर सोलापूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खो-खो संघटक श्रीकांत ढेपे खजिनदार श्रीरंग बनसोडे सोलापूर जिल्हा  खो-खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी  वसंतराव काळे प्रशालेचे प्राचार्य दादासो खारात पर्यवेक्षक सत्यवान काळे सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी अभिनंदन केले प्रीती  काळे हिला क्रीडा प्रशिक्षक संतोष पाटील अतुल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *