महत्वाच्या घडामोडी

वाडीकूरोली च्या प्रीती काळेची राष्ट्रीय खो -खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो संघात निवड

प्रतिनिधी पंढरपूर : –

वाडीकूरोली येथील  वसंतराव काळे प्रशालेतील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबची अष्टपैलू खेळाडू प्रीती अशोक काळे हिची  उस्मानाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघात निवड झाली आहे. दिनांक 5 ते 8 नोव्हेंबर 2022 रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर संपन्न झालेल्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य संघाची निवड करण्यात आली. श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे संचालिका संगीता काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या .

तिच्या निवडीबद्दल  श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब काळे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव सोलापूर खो-खो असोशीएशनचे सचिव सुनील चव्हाण खजिनदार श्रीरंग बनसोडे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खो-खो संघटक श्रीकांत ढेपे प्राचार्य दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे यांनी अभिनंदन केले.

हिंगोली येथे झालेल्या राज्य स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा खो-खो संघात संध्या सुरवसे , साक्षी काळे , अमृता माने साक्षी देठे , शिवानी येड्रावकर , श्वेता भोसले , ऋतुजा यलमार यांची निवड झाली होती. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक संतोष पाटील , अतुल जाधव , समाधान काळे यांचे मार्गदर्शन लाभले……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *