महत्वाच्या घडामोडी

परिचारकांच्या युटोपियन साखर कारखान्यावर दिवाळखोरीची नामुष्की..?

एबी मराठी न्यूज नेटवर्क

2014 साली गाळप सुरु केलेला मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे असणारा परिचारक यांचा ‘युटोपियन शुगर लिमिटेड’ या कारखान्याने वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्ज पुरवठा परत न केल्यामुळे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांनी युटोपियन कारखान्याची दिवाळखोरी प्रक्रिया करण्याचे आदेश 16 डिसेंबर 2022 रोजी दिले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.. याआधी बँकेने ‘एनसीएलटी’ कोर्टात धाव घेतली होती.. त्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे..

उमेश परिचारक हे युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, सहकार आणि ऊस कारखानदारीत परिचारक यांचे नाव अग्रस्थानी घेतलं जातं, मात्र त्यांचाच युटोपियन साखर कारखाना दिवाळखोरीत निघण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, परिचारक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

वित्तीय संस्था कडून घेतलेले कर्ज परतफेड करू शकत नसल्यामुळे कारखान्यावर दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांनी सुरू केली आहे. 16 डिसेंबर 2022 ते 14 जून 2023 पर्यंत दिवळखोरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 30 डिसेंबर पर्यंत दावे दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे कारखान्याच्या गाळप हंगामावर देखील मोठा परिणाम होऊ शकतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *