महत्वाच्या घडामोडी

इतकी हटके लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली नसेल…

प्रतिनिधी /

लग्नसोहळा म्हणला की, काहीतरी हटके करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.. . प्रत्येकजण आपला लग्नसोहळा अविस्मरणीय करण्यासाठी वर्षानुवर्षे नियोजन करत असतो.. लग्नात घालायच्या कपड्यांपासून ते रुखवत आणि जेवनाचं नियोजन अगदी अचूकपणे झाले पाहिजे, असे प्रयत्न प्रत्येक कुटुंबात होत असतात.. लग्नपत्रिकाही कशा असाव्यात यातही प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विचार केला जातो.. लग्नपत्रिकाची डिझाईन कशी असावी, रंग कोणता असावा याचेही नियोजन केले जाते…

अशाच एका इच्छेतून साकारलेली लग्नपत्रिका सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी सुद्धा या पत्रिकेचा फोटो शेअर करून वर- वधूच्या क्रिएटिव्हिटीची वाहवा केली आहे. आपल्याला यावरून समजलेच असेल की, एका फार्मासिस्टच्या डोक्यातून आलेली आयडिया किती भन्नाट आहे..

हे लग्नाचे आमंत्रण चक्क tabletchya pack च्या मागील बाजूसारखे दिसते. या लग्नपत्रिकेत लग्नाची तारीख, वेळ आणि वधू आणि वरची नावे आहेत, आणि यात रिसेप्शनची तारीख आणि वेळ सुद्धा दिलेली आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *