महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! एका उंदरामुळे गेला कॉलेज तरुणीचा जीव…

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील घोणसरे येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.. या घटनेत सर्पदंशाने एका कॉलेज तरुणीचा मृत्यू झाला आहे.. सिद्धी चव्हाण असे या तरुणीचे नाव आहे..

सिद्धी आपल्या घरात गाढ झोपली असताना साप एका उंदराचा पाठलाग करत घरात शिरला आणि त्याने झोपलेल्या सिद्धीला ३ वेळा दंश केला.. या घटनेनंतर सिद्धीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.. मात्र रुग्णालयात नेत असतानाच तिचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे..

दुपारची झोप घेत असलेल्या सिद्धीला याची कल्पना ही नव्हती की आजची झोप ही आपली शेवटची झोप ठरणार आहे.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *