महत्वाच्या घडामोडी

उजनीतून भीमा नदीत मोठा विसर्ग, अनेक बंधारे जाणार पाण्याखाली

एबी मराठी न्यूज नेटवर्क

उजनीसह वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पुन्हा भीमा नदी पात्रावरील बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.. आज सकाळी सहा वाजता उजनीमधून ४० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडला जात आहे.. तर वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० असा एकूण ४१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीपात्रात केला जात आहे..

तर वीर धरणामधूनही आज पहाटेपासून २३ हजार १८५ क्युसेकचा विसर्ग नीरा नदीपात्रात केला जात आहे,,

उजनीच्या पाणलोट क्षेत्रासह नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे..तर पुणे आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाउस झाला आहे.. त्यामुळे उजनीतून ४१ हजार ६०० क्युसेकसह वीर धरणातून येणारा २३ हजार १८५ क्युसेक असा एकूण ६५ हजार ७८५ एवढा विसर्ग संगम पासून भीमा नदीपात्रात येतो आहे.. त्यामुळे नदीपात्रातील अनेक बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *