महत्वाच्या घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत आणखी विसर्ग वाढवला, भीमेला पूर येणार ?

प्रतिनिधी / पंढरपूर

सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी नदी – नाले दुथडी भरून वाहत आहेत.. या पडलेल्या पावसामुळे धरणातील पाण्यात वाढ होत आहे.. सोलापूर जिल्ह्याची जलवरदायिनी असलेलं उजनी धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे.. सातारा जिल्ह्यातील वीर धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे.. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे..

उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात सातत्याने वाढ होत आहे.. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ५०,००० क्युसेक चा विसर्ग सुरु असतानाच दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या विसर्गात २०,००० क्युसेक ने वाढ करून ७०,००० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला.. तर, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या विसर्गात अजून वाढ करून ८०,००० करण्यात आला.. व वीर धरणातून ३४,४४९ क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.. या दोन धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता असून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *