महत्वाच्या घडामोडी

देव दर्शनावरून परतताना दोन तरुणांचा भीषण अपघात ! जागीच मृत्यू

पंढरपूर मंगळवेढा मार्गावरील एकलासपुरजवळ कार आणि मोटार सायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील २ जण ठार झाले आहेत.. अपघातग्रस्त दोघेही मंगळवेढा येथील आहे..

सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर हून आण्णासाहेब दत्तात्रय सावंजी [वय २२ वर्षे] आणि विजय दादासाहेब सावंजी [ वय २२ वर्षे ] हे दोघे त्यांच्या मोटार सायकलवरून मंगळवेढ्याकडे जात होते.. एकलासपूरजवळ मंगळवेढ्याकडून येणाऱ्या कार [ क्र.एम एच १३ डिटी ८४८५ ] सोबत मोटार सायकलची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला..

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.. अपघाताचे वृत्त समजताच तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *