महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! दोन जिवलग मित्रांवर काळाचा घाला…

प्रतिनिधी / जळगाव

जळगाव येथे एका भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. हा अपघात जळगाव पाचोरा रस्त्यावर झाला आहे.. रफिक हुसेन मेवाती ( वय – २३ ) व अरबाज जहांगीर मेवाती ( वय – २० ) अशी या दोन तरुणांची नावे आहेत.. हे दोघेही राणी बांबरूड, ता. पाचोरा या गावचे रहिवासी आहेत..

रफिक आणि अरबाज हे दोघे पेरू विक्रीचा व्यवसाय करतात.. काल दिवसभर पेरूची विक्री करून हे दोघे दुचाकीवर राणीचे बांबरूड येथे आपल्या घरी परतत होते.. त्यानंतर शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळून जात असताना पाचोऱ्याकडून जळगावकडे भरधाव येणाऱ्या कारने दोघांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली..

ही धडक इतकी भीषण होती की रफिक आणि अरबाज या दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे.. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले..

या दोन जिवलग मित्रांच्या अशा अकाली मृत्यूने अख्खा गाव शोकसागरात बुडाला आहे.. रफिक आणि अरबाज यांच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *