महत्वाच्या घडामोडी

मैत्रिणीचा मृतदेह पाहून तिनेही संपवलं जीवन…

प्रतिनिधी / पुणे

पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील शेवाळवाडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. शेवाळवाडीमध्ये दोन बालमैत्रीणींनी आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.. सानिका हरिश्चंद्र भागवत ( वय – १९ ) व आकांक्षा औदुंबर गायकवाड ( वय – १९ ) अशी या दोन मैत्रिणींची नावे आहेत.. सानिका हिने आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आणि आपले जीवन संपवले..

ही घटना सानिकाच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून सानिकाचा मृतदेह खाली उतरवला.. सानिकाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना तिची मैत्रीण आकांक्षाने पाहिले.. आपल्या मैत्रिणीने आत्महत्या केली आहे या गोष्टीचा जबर धक्का आकांक्षाला बसला होता.. हा धक्का सहन न झाल्याने आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली आणि गंभीर जखमी झाल्यामुळे तिचाही मृत्यू झाला आहे..

अचानक घडलेल्या या घटनेने दोघींच्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. दोन्ही मुलींच्या पालकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.. सानिकाने आत्महत्या करण्याचे कारण अजून समजले नाही.. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *