महत्वाच्या घडामोडी

नोकरीसाठी दोन मित्रांनी मिळून केलं असं काही…

प्रतिनिधी / बडोदा

भारतीय रेल्वेने २२ ऑगस्टला एक प्रवेश परीक्षा आयोजित केली होती.. या परीक्षेत एक गैरप्रकार उघडकीस आला आहे.. हा गैरप्रकार काय आहे हे पाहून अनेकांना धक्काच बसेल.. बडोद्याच्या लक्ष्मीपुरा भागात एक खोटा उमेदवार खऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा देताना आढळून आला.. परीक्षा देण्यासाठी त्याने चक्क खऱ्या उमेदवाराच्या अंगठ्याची त्वचाच त्याच्या अंगठ्यावर चिटकवली होती.. यासाठी त्याने डिंकाचा वापर केला होता..

खऱ्या उमेदवाराने एका हॉट प्लेटवर त्याचा अंगठा ठेवला आणि त्वचा बाहेर काढली.. ती त्वचा त्याने खोट्या उमेदवाराच्या अंगठ्याला चीटकवली.. ही कल्पना यशस्वी झाल्याने खोटा उमेदवार परीक्षा केंद्रावर गेला.. मात्र, तिथे फवारलेल्या हँड सॅनिटायझर ने त्याचा सगळा plan फसला.. खोट्या उमेदवाराने तीन वेळा सॅनिटायझर ने हात धुतल्यामुळे ती त्वचा अंगठ्यापासून वेगळी झाली.. पर्यवेक्षकांनी पुन्हा एकदा अंगठ्याचे ठसे घेतल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे..

बडोदा पोलिसांनी खोट्या आणि खऱ्या उमेदवाराला अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.. हे दोघेही मुळचे बिहारचे आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *