महत्वाच्या घडामोडी

आर्मीत भरती होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं , ट्रेनच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत…

प्रतिनिधी / ठाणे

धुळ्याहून ठाण्यात आर्मी अग्निवीर भरतीसाठी आलेल्या एका तरुणाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. रामेश्वर भारत देवरे ( वय – २२ ) असे या तरुणाचे नाव आहे.. ठाण्यातील मुंब्रा एम. एम. व्हैली परिसरातील मौलाना अब्दुल कलम आझाद स्टेडियम येथे आर्मी अग्निवीर प्रक्रिया सुरु आहे.. या भरती प्रक्रियेसाठी रामेश्वर धुळ्याहून आला होता..

भरती प्रक्रियेसाठी आलेल्या रामेश्वरची अचानक तब्येत बिघडली.. तो मुंब्रा स्थानकात बसला होता.. तब्येत बिघडल्यामुळे रामेश्वर याला ओकारी येत होती.. ओकारी करण्यासाठी तो रेल्वे रुळाच्या दिशेने धावला.. परंतु ओकारी करत असताना त्याचे आजूबाजूला लक्ष्य गेले नाही आणि मागून आलेल्या ट्रेनने त्याला जोरदार धडक दिली.. या घटनेची माहिती मिळताच ठाणे लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.. आणि रामेश्वर याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.. या अपघातामुळे रामेश्वर याचे अग्निवीर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.. या घटनेने रामेश्वरच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.. परिसरातही सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *