महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! ट्रेनची खिडकी फोडून ५ फुटी सळई उडाली अन प्रवाशाच्या मानेत आरपार गेली…

प्रतिनिधी / अलिगढ

तुम्हाला माहितीच आहे की रेल्वेचा प्रवास हा इतर वाहनांच्या तुलनेत सुरक्षित मानला जातो.. खिडकीजवळच्या आसनासाठी तर खुपदा भांडण झालेली देखील तुम्ही पाहिली असतील.. मात्र खिडकीजवळची सीट एका प्रवाशासाठी जीवघेणी ठरली आहे..

हरिकेश ( वय – ३२ ) असे या प्रवाशाचे नाव आहे.. हरिकेश हे आपल्या बहिणीच्या लग्नासाठी दिल्लीहून लखनऊला चालले होते.. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत.. डावर स्टेशनजवळ रुळांवर काम चालू होते..

मात्र ठरलेल्या वेळेनुसार हे काम २५ मिनिटे अगोदरच सुरु झाले.. त्याचवेळी तिथून निलांचल एक्स्प्रेस जाऊ लागली.. त्यानंतर अचानक रुळांशेजारी असणारी ५ फुटी सळई हवेत उडाली आणि खिडकीची काच फोडून हरिकेश यांच्या गळ्यातून आरपार गेली..

हरिकेश यांनी खिशात हात घातले होते.. हात बाहेर काढण्याआधीच खिडकी फोडून आत आलेली सळई त्यांच्या मानेतून आरपार गेली होती.. हा सगळा प्रकार अवघ्या काही क्षणातच घडला.. त्यामुळे तेथे असणाऱ्या आजूबाजूच्या प्रवाशांना काहीच करता आले नाही..

हरिकेश यांच्यासोबत झालेली ही घटना पाहून आसपासच्या प्रवाशांना धक्काच बसला आहे.. जनरल डब्यात हरिकेश यांचा निष्प्राण देह होता.. मजूर आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा हरिकेश यांच्या जीवावर बेतला.. हरिकेश यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी शालिनी दुबे यांच्याशी झाला होता.. त्यांना दोन मुलेही आहेत..

हरिकेश यांच्या अशा अकाली जाण्याने या दोन मुलांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले आहे.. हरिकेश यांचा तीन दिवसानंतर वाढदिवस होता.. त्यांच्या घरी वाढदिवसाची तयारीही सुरु होती मात्र वाढदिवसाच्या तीन दिवस अगोदरच हरिकेश यांनी जगाचा निरोप घेतला..

या घटनेनंतर हरिकेश यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. तर परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *