महत्वाच्या घडामोडी

भरधाव ट्रकने दिली गेंड्याला धडक! पाहा नक्की काय झाले…

प्रतिनिधी / आसाम

अनेकवेळा रस्ते अपघातांमध्ये वन्य प्राण्यांना वाहनाची धडक बसल्याने मोठे अपघात झालेले आपण पाहिले आहे.. भरधाव वाहनांची धडक बसून अनेक जनावरे गंभीर जखमी होतात.. अशीच एक धक्कादायक घटना आसाममध्ये घडली आहे..

एक गेंडा रस्त्यावरून जात असताना एका भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली आहे.. धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने निर्दयीपणे तिथून पळ काढला आहे.. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय..

हा व्हिडीओ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान परिसरातील राष्ट्रीय महामार्ग-३७ चा आहे.. या व्हिडीओमध्ये प्राण्यांच्या कॉरिडॉरच्या एका बाजूने जंगली गेंडा येताना दिसतो आहे, तर माल वाहून नेणारा एक अवजड ट्रक भरधाव वेगाने समोरून येताना दिसतो आहे.. ट्रक येताना पाहून हा गेंडा वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो..

मात्र, या प्रयत्नात गेंड्याला ट्रकची जोरात धडक बसते आणि तो रस्त्यावर कोसळतो.. धडक बसल्यानंतर ट्रक चालक मात्र तिथून पळ काढतो.. सुदैवाने या अपघातात गेंड्याला काही ईजा झाली नाही, तो कसाबसा उभा राहिला आणि जंगलात जाण्याचा प्रयत्न करू लागला.. हा व्हिडीओ पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *