महत्वाच्या घडामोडी

ती एक चूक महागात पडली आणि वाढदिवस ठरला शेवटचा दिवस…

प्रतिनिधी / मिर्झापूर

उत्तर प्रदेशातील शिवशंकरी धाममधील दीक्षितपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.. दीक्षितपूर येथील ओव्हरब्रिजवरून पडून एका विध्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.. वाढदिवसादिवशीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे..

मिर्झापूर जिल्ह्यातील अदलहाट पोलीस स्टेशन हद्दीतील पचेगडा राजपूर, दीक्षितपूर येथील रहिवासी असलेल्या जयराम यांचा हा मुलगा आहे.. धर्मेंद्र कुमार ( वय – २० ) असे या तरुणाचे नाव आहे.. धर्मेंद्र हा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी साजरी करून घरी परतण्यासाठी निघाला होता..

धर्मेंद्रला त्याच्या मित्रांनी कॉलेजजवळ सोडले.. आणि मित्र निघून गेल्यानंतर धर्मेंद्रने आपली सायकल कॉलेजमधून घेण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजवरून पलीकडे उडी मारली.. परंतु दुभाजकाच्या मध्यभागी उडी मारताना धर्मेंद्रचा तोल गेला आणि पुलावर न जाता तो खाली पडला..

सुमारे ६० फूट उंची असलेल्या पुलावरून खाली पडल्याने धर्मेंद्रचा जागीच मृत्यू झाला आहे.. आनंदाने आणि उत्साहाने भरलेला दिवस होता पण त्यात एक चूक भोवली आणि आयुष्य संपले.. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि धर्मेंद्रचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.. या घटनेने धर्मेंद्रच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *