महत्वाच्या घडामोडी

थोडीसी दारू चाहिए ! असे म्हणत चिमुकला रडून दंगा करतोय.. पाहा हा व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

लहान मुलांसमोर दारू न पिणे,त्यांना व्यसनापासून लांब राहायला शिकवणे हे प्रत्येक पालकांचे काम आहे.. मात्र आजच्या नव्या काळात लहान वयातच मुलांसमोर अशा काही अशोभनिय गोष्टी येतात की त्याचं रुपांतर नको त्या हट्टात होते..

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला आपल्या बाबांकडे मलाही दारू दे, असा हट्ट करताना दिसत आहे.. दूध पिण्याच्या वयात हा चिमुकला वडिलांकडे दारूची मागणी करत आहे..

या व्हिडीओमधील रडणाऱ्या मुलाला पाहून आणि त्याच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकून अनेकांना हसू येत आहे.. हा व्हिडीओ अनेकांना फनी आणि मनोरंजक वाटत आहे.. परंतु चर्चा कितीही असली तरी मुलांसमोर पालक आणि समाजाने आपण नको त्या वयात काय ठेवतो आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे.. अशीही प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहून येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *