महत्वाच्या घडामोडी

हिवाळ्यात अंघोळ करण्यासाठी तरुणाने केला देसी जुगाड.. पाहा नक्की काय केलं…

प्रतिनिधी / व्हायरल

थंडीत अंघोळ करणे म्हणजे जणू काही कसरतच म्हणावी लागेल.. थंडीत अंघोळीच नाव जरी काढलं तरी अनेकांना नकोस वाटतं.. उन्हाळ्यात मात्र गरमीने हैराण झालेले लोक दिवसातून तीन चार वेळा अंघोळ करतात.. हिवाळ्यात अंघोळीसाठी गरम पाणी घेतलं तरी ते काही वेळात थंड होतं..

लहान मुलांना तर सकाळी लवकर उठून शाळेत जाताना अंघोळ नको म्हणून रडताना तुम्ही पाहिले असेलच.. सध्या सोशल मिडीयावर असाच एका व्यक्तीच्या देसी जुगाडाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.. या व्यक्तीने हिवाळ्यात अंघोळ करताना थंडी वाजू नये यासाठी एक अनोखी शक्कल लावली आहे..

या व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती एका तलावामध्ये उतरून अंघोळ करताना दिसत आहे.. त्यानंतर ही व्यक्ती पाण्यामध्येच गवत जाळून आगीपासून शेकोटी घेत असल्याचे दिसत आहे.. ते पाहून सर्वच नेटकरी अवाक झाले आहेत..

या व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती तलावाच्या पाण्यात अंघोळ करताना आगीची शेकोटी घेताना दिसत आहे.. या व्यक्तीचा देसी जुगाड चांगलाच अनेकांच्या पसंतीला उतरला आहे.. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.. अनेकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *