महत्वाच्या घडामोडी

तरुणाने विमानात विकली फळे.. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही…

प्रतिनिधी / व्हायरल

आजकाल अनेक फेरीवाल्यांना खाद्य पदार्थ विकताना तुम्ही बस किंवा ट्रेनमध्ये पाहिले असेल.. आपल्याकडील वस्तू ग्राहकांनी विकत घेण्यासाठी ते अनेक नवनवीन ट्रिक्स वापरताना आपण पाहतो.. फेरीवाले आपल्या आवाजात बदल करतात तर कधी विनोदही करतात, याने ग्राहकांचे मनोरंजनही होते.. आणि विक्रीच्या या पद्धतीने फेरीवाल्यांनाही फायदा होत असतो. असाच एक मनोरंजक पद्धतीने वस्तू विकत असलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे..

ही व्यक्ती बस किंवा ट्रेनमध्ये नाही तर चक्क प्लेन मध्ये वस्तू विकताना दिसत आहे.. हा मजेदार व्हिडीओ bjbala kpy या नावाच्या इन्स्टाग्राम युजरने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.. या व्हिडीओ मध्ये एक तरुण चक्क प्लेनमध्ये फळ विकताना दिसत आहे.. त्याची फळ विकण्याची पद्धत इतकी मजेशीर आहे की, त्याचा आवाज ऐकून बसमध्ये विक्री करणाऱ्या फेरीवाल्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभे राहील.. हा तरुण प्लेनमध्ये त्याच्या जवळील वस्तू विकण्याचा प्रयत्न करीत आहे.. त्याचा आवाज आणि चेहऱ्यावरील भाव प्लेनमधील प्रवाशांना पोट धरून हसवत आहेत.. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, फेरीवाल्यांना कधीपासून प्लेनमध्ये प्रवेश मिळाला.. मात्र हा कोणी फेरीवाला नसून प्लेनमधील एक प्रवासीच आहे.. तो आपल्या कुटुंबासोबत प्रवास करतो आहे.. आपल्या कुटुंबाला हसवण्यासाठी, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी त्याने हे भन्नाट कृत्य केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *