महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! उधारीचे पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला स्कूटरला बांधून पळवले…

प्रतिनिधी / ओडिशा

ओडिशातील कटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.. उधारीचे पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला चक्क त्याचे दोन्ही हात बांधून त्यानंतर रस्सीने स्कूटरला बांधून २ किलोमीटर पळवले आहे.. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे..

आजकाल उधारीवर दिलेले पैसे वेळेत परत केले नाहीत म्हणून मारहाणीच्या घटना अनेक ठिकाणी आपण पाहिल्या आहेत.. तसेच सावकारांनी पैशासाठी केलेल्या अत्याचाराच्याही अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत असतात..

जगन्नाथ बेहरा असे या पिडीत तरुणाचे नाव आहे.. या व्हिडीओमध्ये आरोपींकडून जगन्नाथने १५०० रुपये उधारीवर घेतले होते.. हे पैसे त्याने वेळेवर परत न केल्यामुळे आरोपींनी जगन्नाथचे दोन्ही हात स्कूटरला दोरीने बांधले आणि कटकच्या गर्दी असणाऱ्या रस्त्यावर ०२ किलोमीटरहून अधिक पळायला लावले..

या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी जगन्नाथला ताब्यात घेऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *