महत्वाच्या घडामोडी

आई ओरडली म्हणून मुलाने संपवले जीवन…

प्रतिनिधी / परभणी

परभणी येथील पूर्णा तालुक्यातील वझुर येथे एका तरुणाने रागाच्या भरात शेतामध्ये असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. आकाश माधव टाले. असे या तरुणाचे नाव आहे.. पूर्णा तालुक्यातील वझुर येथे आकाश टोले हा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता..

आकाश रात्री झोपण्यासाठी शेतामध्ये जात होता.. यावेळी अंधार असल्याने आकाशच्या आईने शेतामध्ये झोपण्यासाठी जाऊ नकोस जर गेलास तर शेतातच झोप घरी येऊ नकोस, असे म्हणाली.. या गोष्टीचा राग आल्याने आकाशने समाज माध्यमावर स्टेटस ठेवून आपल्या भावना व्यक्त करत रात्रीच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली..

सकाळी आकाश घरी परत न आल्यामुळे त्याच्या आईने शेतात जाऊन पहिल्यानंतर आकाश हा लिंबाच्या झाडाला लटकत असल्याचे दिसून आले.. या घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी त्र्यंबक शिंदे यांनी वझुर येथे भेट देऊन पंचनामा केला आहे.. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *