पर्यावरण,शिक्षण

विधार्थ्यानी आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत…

प्रतिनिधी / पंढरपूर

“विद्यार्थी ” हा राष्ट्राचा महत्वाचा घटक असून गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षण घेतलेली पिढीच देशाला प्रगतीच्या उंच शिखरावर नेऊ शकते.. शिक्षण हे विध्यार्थ्यांच्या वाढ आणि विकासातील महत्वाची भूमिका पार पाडणारे शस्त्र आहे.. शिक्षणाची प्रबळ इच्छा, जिद्द, चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी यामुळेच विद्यार्थी घडू शकतात.. शिक्षण ही जीवनभर सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे.. विध्यार्थ्यानी आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” असे प्रतिपादन राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे वरिष्ठ सल्लागार प्राचार्य डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी केले..

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट ८ अंतर्गत ‘ महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता सुधार हमी कक्ष’ च्या वतीने आयोजित ‘ येस्सेन्शल स्कील फॉर सोशल इंटरप्रिन्युअरशीप ‘ या विषयावरील आठ दिवसाच्या या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते..

प्राचार्य डॉ. प्रमोद पाब्रेकर पुढे म्हणाले की, ” आपल्या परिसरात असणाऱ्या साधन संपत्तीवर आधारित शिक्षण आपणास घेता आले पाहिजे. आजूबाजूच्या समस्या आणि गरज लक्ष्यात घेवून शिक्षक आणि विध्यार्थ्यानी काम करणे आवश्यक आहे.. प्रत्येक विध्यार्थ्यामध्ये खूप शक्ती असते, तिचा योग्य वापर करून शिक्षण घेतल्यास गुणवत्तापूर्ण पिढी निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.. विध्यार्थ्यानी शैक्षणिक क्षेत्रातील नवीन पद्धती आत्मसात करून शिक्षण घ्यावे.. कौशल्याधारित शिक्षणातून रोजगार निर्मिती होवू शकते.”

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, ” आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो.. विध्यार्थ्यानी महाविद्यालयीन जीवनात मिळालेली संधी शिक्षण घेण्यासाठी वापरली पाहिजे.. कौशल्ये पूर्ण शिक्षण घेतलेली पिढी उद्योग आणि सेवा क्षेत्रात भरीव स्वरूपाचे योगदान देऊ शकते.. ज्या देशात कौशल्ये प्राप्त तरुण आहेत, त्याच देशात नोकऱ्या आणि उद्योग आहेत.. भारतात ही उणीव मोठ्या प्रमाणात जाणवते.. म्हणूनच रुसा या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याधारित शिक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे.. याचा विध्यार्थ्यानी अधिकाधिक फायदा करून घ्यावा.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. अमर कांबळे यांनी यांनी करून दिला.. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, आयक्यूएसीचे सहसमन्वयक डॉ. समाधान माने, रुसा समन्वयक डॉ. चंद्रकांत काळे, सहसमन्वयक डॉ. योगेश पाठक, सिनिअर विभागातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रघुनाथ पवार यांनी केले.. शेवटी उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *