स्पेशल स्टोरीज

स्वतःच्या शिक्षणासाठी पाणीपुरी विकणाऱ्या पोरीची गोष्ट…

प्रतिनिधी / स्पेशल स्टोरी

परिस्थिती समोर हरलेले अनेकजण आपण पाहिले असतीलच, एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर, अनेकजण प्रयत्न करण्याऐवजी हार मानतात. पण याच्याविरुद्ध काहीजण स्वतःच्या कष्टाच्या जोरावर परिस्थितीलाही हार मानायला लावतात. आपली जर कष्ट करायची तयारी असेल तर आपण काहीही मिळवू शकतो. याचचं एक उत्तम उदाहरण सध्या सोशल मिडीयावर व्हायलर होत आहे.

फोटो – सोशल मिडिया

ही प्रेरणादायी गोष्ट आहे पंजाबमधील मोहाली येथील मुलीची. जिने परिस्थितीपुढे हार न मानता स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पाणीपुरी विकण्याचा निर्णय घेतला. या मुलीचं नाव पूनम आहे. पूनम हिने स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पाणीपुरी, भेळपुरी पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी फूड ब्लॉगर harry uppal यांनी पूनमच्या व्यवसायाला भेट दिली.

त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या instagram वरून शेयर केला आहे. पूनमच्या जिद्दीने व कष्टाने नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत. तिची ही जिद्द प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *