महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! मुलाने संपत्तीच्या वादातून बॅटने मारहाण करत आईला संपवले…

प्रतिनिधी / मुंबई

नुंबई येथे पोटच्या मुलाने संपत्तीच्या वादात वृद्ध आईला बेसबॉल बॅटने मारहाण करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. त्यानंतर मुलाने आईचा मृतदेह खोक्यातमध्ये भरून नोकराच्या मदतीने रायगडच्या दरीत नेऊन फेकला..

वीणा गोवर्धनदास कपूर ( वय – ७४ ) असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.. सचिन कपूर असे मुलाचे नाव असून छोटू उर्फ लालकुमार मंडह असे नोकराचे नाव आहे.. वीणा कपूर या जुहूच्या गुलमोहोर रोड क्र. ५ येथील कल्पतरू सोसायटीमध्ये राहतात..

काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या जावेद अब्दुल मापारी यांनी वीणा हरवल्या असल्याची तक्रार पोलिसात केली होती.. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली..

वीणा यांचा मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक असून त्या धाकटा मुलगा सचिन याच्यासोबत राहत होत्या.. परंतु वारंवार वीणा आणि मुलगा सचिन यांच्यात संपत्तीवरून वाद होत होते.. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले होते हे पोलिसांना समजले..

त्यानंतर पोलिसांना सचिन याच्यावर संशय आला व त्यांनी वीणा आणि सचिनच्या मोबाईलचे लोकेशन तपासले.. तेव्हा वीणा यांचे लोकेशन जुहू तर सचिन याचे लोकेशन पनवेल दाखवत होते.. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता सचिन आणि नोकर छोटू हे माऊली इमारतीच्या फ्लॅट २०३ मध्ये आल्याचे आढळले..

त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले.. सचिन याची कसून चौकशी केली असता सचिनने आई वीणा यांच्याशी संपत्तीच्या वादातून भांडण झाले आणि हाताने व बेसबॉल बॅटने मारहाण करून त्यांची हत्या केल्याचे कबूल केले.. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वीणा यांचा मृतदेह एका खोक्यात भरून रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे दरीमध्ये फेकून दिल्याचेही कबूल केले..

या घटनेनंतर पोलिसांनी वीणा यांचा धाकटा मुलगा सचिन आणि नोकर छोटू ऊर्फ लालकुमार मंडह यांना अटक केली आहे.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *